एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच तापमानात प्रचंड वाढ

Foto
खुलताबाद, (प्रतिनिधी)  :  एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच तापमानात प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामकाज व्यवहारांवर परिणाम होत आहे. मे महिन्यात पडणारे कडक उन्ह चक्क एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पडत आहे. यामुळे नागरिकांच्या ारोग्यसमस्यांमध्ये वाढ होत असून उन्हाच्या आजारांची लागण पसरण्याची चिंता निर्माण झाली आहे.

सकाळीच दहा वाजे नंतर कडक उन्हामुळे तापमान वाढत आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाज व्यवहार करणे आवघड होत आहे. शेतातील
उभ्या पिकांची सोंगणीचे कामे सुरु आहे परंतु कडक उन्हामुळे ही कामे त्रासदायक ठरत आहे. कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. तर जनावरेही त्रस्त होताना दिसत आहे. या उन्हाचा दैनदिन कामा बरोबरच व्यवहारावर ही परिणाम होत आहे. खेडे गावामध्ये देखील उष्णतेचा कहर वाढत चालला आहे. मध्य तरी अवकाळी पाऊस पडल्याने हवामानामध्ये गारवा निर्माण झाला होता. परंतु आता तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. वाढत्या उन्हाचा फटका बसू नये म्हणून स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.

बहुतांशी ठिकाणी दुपारी शुकशुकाट पहावयास मिळत आहे. सकाळी लवकर व्यवहार सुरू होत आहे व रात्री उशीरा पर्यंत सुरु राहत आहे. नागरिक बाहेर पडणे टाळत आहे. तर आठवडी बाजार वार्षिक यात्रा महोत्सव वरही उन्हाचा परिणाम जाणवत आहे. उन्हापासून स्वतःची काळजी घ्यावी

- डॉ. अभय धानोरकर,
जिल्हा आरोग्य अधिकारी